नवीन सूचीबद्धतेसाठी निकष

इनकॉर्पोरेशन

कंपनी कायदा,1956 अंतर्गत कंपनीचे इनकॉर्पोरेशन झालेले असले पाहिजे.

फायनान्शिअल्स

  • इश्यू नंतरचे पेड अप कॅपिटल
    कंपनीचे इश्यू नंतरचे पेड अप कॅपिटल हे किमान 1 कोटी रूपये असले पाहिजे.
  • नेटवर्थ
    नुकत्याच करण्यात आलेल्या लेखापरिक्षणाच्या निकालांनुसार नेटवर्थ हे (पुर्नआढावा साठयाव्यतिरिक्त) किमान 1 कोटी रूपये असले पाहिजे.
  • नेट टॅंजिबल असेटस
    नुकत्याच करण्यात आलेल्या लेखापरिक्षणाच्या निकालांनुसार किमान 1 कोटी रूपये असले पाहिजे.
  • आधीची कामगिरी
    आधीच्या तीन आर्थिक वर्षांपैकी (प्रत्येक आर्थिक वर्ष हे किमान 12 महिन्यांचे असले पाहिजे) किमान दोन वर्षांसाठी कंपनी कायदा,1956 च्या कलम 205 नुसार वितरणयोग्य फायदा असला पाहिजे.वितरणयोग्य फायदा मोजण्यासाठी असामान्य मिळकत विचारात घेण्यात येणार नाही.
    किंवा
    नेटवर्थ हे किमान 3 कोटी रूपये असले पाहिजे.

इतर आवश्यकता

  • कंपनीची स्वतःची वेबसाईट असणे अत्यावश्यक आहे.
  • कंपनीने डिमॅट सिक्युरिटीजचे व्यवहार करणे अत्यावश्यक आहे आणि दोन्ही ठेवीदारांकडून तसा करार करून घेतला पाहिजे.

डिस्क्लोजर्स

अर्जकर्ती कंपनी किंवा प्रवर्तक कंपनीकडून खालील प्रमाणपत्रे देणे आवश्यक आहे.

अ) बोर्ड फॉर इंडस्ट्रियल अँड फायनान्शिअल रिकन्स्ट्रक्शन (बीआयएफआर) कडे कंपनीला रेफर केलेले नसावे.

नोंद: बीआयएफआरमधून बाहेर पडण्यात आलेल्या कंपनीला विचारात घेण्यात येईल.

ब) कंपनीविरोधात न्यायालयात वाईंडिंग अप याचिका दाखल नसली पाहिजे.किंवा लिक्विडेटर नियुक्त करण्यात आलेला नसावा.


बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवरून मु"य मंडळाकडे स्थलांतर

ज्या कंपनीला बीएसईच्या मु"य मंडळात स्थलांतर करायचे असेल तिने पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत.कंपनीची बीएसई एसएमईच्या प्लॅटफॉर्मवर किमान दोन वर्षे नोंदणी असली पाहिजे व तितका कालावधी व्यवहार झालेले असले पाहिजेत मगच सेबीचे दिनांक 18 मे 2010 रोजीच्या परिपत्रकानुसार व आयसीआर मार्गदर्शक तत्वे प्रकरण एक्स बी नुसार मु"य मंडळावर स्थलांतर करता येणे शक्य होईल.