बिड
बिड म्हणजे गुंतवणूकदाराच्या वतीने सिक्युरिटीजची मागणी जी सिस्टिम मधील सिंडिकेट/सब सिंडिकेट सदस्यांकडून नोंदविण्यात येते.किंमत आणि आकारमान हे बिडचे दोन प्रमुख घटक असतात.
बिडर
बुक बिल्डिंग प्रकि"येमध्ये बिड करणारी व्यक्ती
ऑड लॉट
मार्केट लॉटपेक्षा कमी असणारे कोणतेही शेअर्स म्हणजे ऑड लॉट
बुक रनिंग लिड मॅनेजर
इश्यूअर कंपनीने नेमलेला लिड मर्चंट बॅंकरला बुक रनिंग लिड मॅनेजर म्हणून संबोधण्यात येते.इश्यूअर कंपनीच्या ऑफर डॉक्युमेंटमध्ये बुक रनिंग लिड मॅनेजरचे नाव देण्यात आलेले असते.
मार्केट मेकर्स
विशिष्ट स्कि"पसाठी टू वे कोट देणारी व्यक्ती म्हणजे मार्केट मेकर.स्कि"पमध्ये लिक्विडिटी आणणे हे त्या मार्केट मेकरचे प्रमुख कार्य असते.(अधिक माहिती सेबीच्या 26 एप्रिल 2010 च्या परिपत्रकात दिली आहे)
फलोअर प्राईस
बिड पेक्षा कमी ऑफर प्राईस नोंदता येत नाही.बुक रनिंग लिड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून इश्यूअर कंपनी फलोअर प्राईस निश्चित करते.
मर्चंट बॅंकर
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (मर्चंट बॅंकर्स) रेग्युलेशन्स,1999 अंतर्गत नोंदणी करण्यात आलेली व्यक्ती.
सिंडिकेट मेंबर्स
इश्यूचा बुक रनिंग लिड मॅनेजर हा सिंडिकेट मेंबरची नेमणूक करतो.जो गुंतवणूकदारांच्या बिडस बुक बिल्डिंग सिस्टिममध्ये नोंदवितो.सिंडिकेट मेंबर्स हे सेबीकडे मध्यस्थ म्हणून नोंदले गेलेले असतात जे अंडररायटिंगचे काम देखील करतात.
ऑर्डर बुक
हे एक ईलेक्ट्रॉनिक बुक असते ज्यात रिअल टाईम बेसिसवर कंपनीच्या शेअर्सची मागणी दर्शविते.