सूचीबद्धतेसाठी मार्गदर्शक

भांडवल

भांडवलाचे इश्यू नंतरचे दर्शनी मूल्य पंचवीस कोटी रूपयांपेक्षा जास्त नसावे.

ट्रेडिंग लॉटची साईझ

  • ऍप्लिकेशन आणि ट्रेडिंग लॉटची साईझचा आकार हा 1,00,000 रू.पेक्षा कमी नसावा
  • किमान डेप्थ ही 1,00,000 रू.असावी आणि कोणत्याही वेळी ती 1,00,000 रू.पेक्षा कमी नसावी.
  • गुंतवणूकदारांचे 1,00,000 रू.पेक्षाचे कमी होल्डिंग हे एकाच वेळी मार्केट मेकरद्वारे ऑफर करता येउ शकेल.
  • मात्र प्रत्यक्षात विवक्षित कालावधीनंतर मार्केट लॉट हा रिव्हायव्हलसाठी पात्र राहील.

सहभाग

एक्स्चेंजचे सध्याचे सदस्य हे एसएमई प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी होण्यास पात्र असतील.

अंडररायटिंग

इश्यू 100 टक्के अंडरराईट केला जाईल व मर्चंट बॅंकर हे त्यांच्या खात्यात 15 टक्क्यांपर्यंत अंडरराईट करू शकतील.