सूचीबद्धता प्रक्रिया

बीएसई एसएमईवर नोंदणी प्रकि"येतील पाच प्रमुख टप्पे

नियोजन

सल्ला देण्यासाठी जारीकर्ता कंपनी मर्चंट बॅंकर किंवा बॅंकर्सचा सल्ला घेते आणि त्यांची नेमणूक करते.

पूर्वतयारी

भरावयाची कागदपत्रे मर्चंट बॅंकरकडून तयार करण्यात येतात. सर्व कागदपत्रे ज्यात आर्थिक कागदपत्रे,मटेरियल कॉन्ट्रॅक्टस,सरकारी परवानग्या,प्रवर्तकांची विस्तृत माहिती यांचा समावेश असतो अशी कागदपत्रे तपासण्यात येतात. आयपीओ स्ट्रक्चरचे प्लॅनिंग,शेअर वीमा आणि आर्थिक गरजा यांचा त्यात समावेश असतो.
प्रकि"या

अर्ज भरण्याची प्रकि"या:
  • डीआरएचपी/ड्राप्ट प्रॉस्पेक्टस सादर करणे-ही कागदपत्रे मर्चंट बॅंकरकडून तयार करण्यात येतात तसेच गरजेनुसार एक्स्चेंज व सेबीद्वारे भरण्यात येतात.
  • पडताळणी आणि साईट व्हिजिट-बीएसईकडून कागदपत्रांची तपासणी व पुढील प्रकि"या करण्यात येते.एक्स्चेंजच्या अधिका-यांवर कंपनीच्या जागेच्या ठिकाणी भेट देण्याची जबाबदारी असते.लिस्टिंग सल्लागार समितीकडून प्रवर्तकांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येते.
  • परवानगी - जारीकर्ता कंपनीकडून सर्व आवश्यकतांची पूर्तता झाल्यानंतर समितीच्या शिफारशीनुसार बीएसईकडून प्राथमिक परवानगी देण्यात येते.
    आरएचपी/प्रॉस्पेक्टस भरणे- इश्यू कोणत्या तारखेला खुला व बंद होणार आहे त्याची नोंद करून मर्चंट बॅंकर ही कागदपत्रे आरओसीकडे सादर करतो.आरओसीकडून एकदा परवानगी मिळाली की,त्यांच्याकडून आवश्यक त्या कागदपत्रांद्वारे एक्स्चेंजला इश्यू खुला होण्याची तारीख कळविण्यात येते.

पब्लिक ऑफरिंग

वेळापत्रकानुसार इनिशिअल पब्लिक ऑफरिंग खुली होते आणि बंद होते.आयपीओ बंद झाल्यानंतर अलॉटमेंट निश्चितीसाठी चेकलिस्टनुसार कंपनी एक्स्चेंजकडे आपली कागदपत्रे सादर करते.

लिस्टिंग झाल्यानंतर

बीएसईकडून अलॉटमेंटचे निकष निश्चित करण्यात येतात व लिस्टिंग आणि ट्रेडिंगची नोटीस जारी करण्यात येते.