बुक बिल्डिंग

पब्लिक इश्यूजच्या बाबतीत

इनिशिअल पब्लिक ऑफर (आयपीओ), राईटस इश्यू किंवा प्रायव्हेट प्लेसमेंटच्या माध्यमातून कॉर्पोरेट कंपन्या या प्रायमरी मार्केटमधून भांडवल उभे करू शकतात.इनिशिअल पब्लिक ऑफर (आयपीओ) म्हणजे प्रायमरी मार्केटमध्ये जनतेला प्रतिभूती विकणे.इनिशिअल पब्लिक ऑफर ही फिक्स्ड प्राईस मेथड,बुक बिल्डिंग मेथड किंवा दोन्ही पद्‌धतींचा एकत्रित वापर करून देता येउ शकते.

बुक बिल्डिंगबाबत अधिक माहिती

इनिशिअल पब्लिक ऑफर्स (आयपीओ) किंवा फॉलोऑन पब्लिक ऑफर्स (एफपीओ) च्या माध्यमातून किंवा दोन्हींच्या माध्यमातून प्राईस आणि डिमांड रिकव्हरीला मदत करण्यासाठी भांडवल उभे करण्यासाठी कंपन्या जी पद्‌धत वापरतात ती म्हणजे बुक बिल्डिंग.ही अशी पद्‌धत आहे की, ज्यावेळेला ऑफरसाठीचे बुक खुले करण्यात येते,ज्यात गुंतवणूकदारांकडून विविध किंमतींना बोली घेण्यात येते,जारीकर्त्याने निश्चित केलेल्या किंमतीच्या मर्यादेत.संस्थात्मक तसेच रिटेल गुंतवणूकदारांसाठी ही प्रकि"या असते.या प्रकि"येत जी मागणी पुढे येते त्यावर बंद झालेल्या बोलींवर इश्यूची किंमत ठरत असते

प्रकि"या:

  • जारीकर्ता ज्याला ऑफर इश्यू करायची आहे तो आघाडीच्या मर्चंट बॅंकर किंवा बॅंकर्सना "बुक रनर्स' म्हणून नामनिर्देशित करतो.
  • जारीकर्ता हा जारी करण्यात येणा-या प्रतिभूतींची सं"या आणि बोलींची किंमत ठरवत असतो.
  • गुंतवणूकदारांना ज्यांच्याकडे मागणी नोंदवायची असते अशा सिंडिकेंट सदस्यांची जारीकर्ता नेमणूक करतो.
  • सिंडिकेट सदस्य हे मागणीची नोंद "ईलेक्ट्रॉनिक बुक' मध्ये करतात.या प्रकि"येला "बिडिंग' म्हणतात जी खुल्या लिलावासारखीच असते.
  • बुक हे सर्वसाधारणपणे 5 दिवसांसाठी खुले असते.
  • निर्धारित केलेल्या किंमतीतच बोली लावायची असते.
  • बुक बंद होण्याआधी गुंतवणूकदार हे बोलींमध्ये सुधारणा करू शकतात.
  • बुक बिल्डिंग कालावधी संपल्यानंतर बुक रनर्सकडून विविध किंमतींवरील मागणीच्या आधारावर बोलींचे मूल्यांकन करण्यात येते.
  • प्रतिभूती कोणत्या किंमतीवर जारी करायच्या याचा निर्णय बुक रनर्स आणि जारीकर्ता यांच्याकडून घेतला जातो.
  • सर्वसाधारणपणे शेअर्सची सं"या निश्चित करण्यात येते,अखेरीस प्रतिशेअर्सच्या किंमतीच्या आधारावर इश्यूचा आकार गोठविण्यात येतो.
  • यशस्वी बोलीदारांना प्रतिभूती देण्यात येतात.रिसेटनंतर रिफंड ऑर्डर मिळते.