बुक बिल्डिंगसाठीची मार्गदर्शक तत्वे

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन्स 2009 च्या प्रकरण 11 मध्ये बुक बिल्डिंग प्रकि"येची मार्गदर्शक तत्वे विषद करण्यात आली आहेत.

बीएसईची बुक बिल्डिंग व्यवस्था

  • बीएसईच्या प्रायव्हेट नेटवर्कच्या माध्यमातून चालविण्यात येणा-या बुक बिल्डिंग सॉफटवेअरच्याद्वारे बीएसई बुक बिल्डिंग प्लॅटफॉर्म देते.
  • या व्यवस्थेचा समावेश जगातील सर्वात मोठया ईलेक्ट्रॉनिक बुक बिल्डिंग नेटवर्क्समध्ये होतो. भारतातील 350 शहरे व त्यातील 7000 वर्क स्टेशन्स जी लिज्ड लाईन्स,व्हीसॅटस आणि कॅंपस लॅन्सद्वारे संलग्न आहेत अशा ठिकाणी तिचा विस्तार पसरलेला आहे.
  • संपूर्ण बोली प्रकि"ये दरम्यान ईलेक्ट्रॉनिकली बोली नोंदविण्यासाठी हे सॉफटवेअर इश्यूचे बुक रनर्स आणि सिंडिकेट सदस्य यांच्याकडून वापरण्यात येते.
  • पारदर्शता आणण्यासाठी बीएसई वेबसाईट तसेच बीएसई टर्मिनलवर या व्यवस्थेद्वारे प्रमाण विरूद्‌ध किंमत यांचा आलेख दर्शविण्यात येतो.