बाजाराची माहिती

एसएमई प्लॅटफॉर्मवरील ट्रेडिंग, क्लिअरिंग आणि सेटलमेंट चे वैशिष्टयपूर्ण मुद्दे

  • वेळः वर उल्लेख करण्यात आलेले ट्रेडिंग हे बीएसई ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर नेहमीच्या ट्रेडिंगच्या वेळेत करता येते.
  • टीक साईझः बीएसई एसएमई सेगमेंट मध्ये करण्यात येणा-या ट्रेडिंगची टीक साईझ ही कम्पलसरी रोलिंग सेटलमेंट सेगमेंट इतकीच असते.
  • टी प्लस टू बेसिसः एसएमई सेगमेंट मध्ये होणारे ट्रेडिंग, क्लिअरिंग आणि सेटलमेंट हे टी प्लस टू बेसिसवरच होते.
  • ट्रेडिंग लॉट साईझः सेबीच्या 21 फेब्रुवारी 2012 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार मिनिमम ऍप्लिकेशन आणि ट्रेडिंग लॉट साईझ बाबतची मार्गदर्शक तत्त्वे आखून देण्यात आली आहेत. त्यानुसार कमित कमी डेप्थ ही एक लॉट असली पाहिजे.
  • ट्रेडिंगमध्ये सहभागः बाजारात सहभाग घेणा-या सर्वांना बीएसई एसएमई स्क्रिप्सचे व्यवहार करण्याची परवानगी असते.
  • टेकअप/गिव्ह अपः सदस्य ब्रोकर्स कडून कस्टोडियल क्लिअरिंग मेंबर्स पर्यंत देण्यात येणा-या ट्रेडसच्या गिव्हअप/टेक अप सुविधेला या बीएसई एसएमई स्क्रिप्समध्ये मान्यता आहे.
  • ट्रेडसः बीएसई एसएमई स्क्रिप्समध्ये करण्यात येणारे व्यवहार हे डिमॅट मोडमध्येच सेटल करणे बंधनकारक असते.
  • क्लोज आउट/ऑक्शनः बीएसई एसएमई ग्रुप्स स्क्रिप्समधील शॉर्टेजेसची ऑक्शन/क्लोज आउट प्रक्रिया ही कम्पल्सरी रोलिंग सेटलमेंट सेगमेंट मध्ये व्यवहार होणा-या स्क्रिप्सप्रमाणेच असते.
  • शॉर्टेजेसः "एमग्रुप स्क्रिप्समधील शॉर्टेजेस ऑक्शन केले जातात व "एमटी' ग्रुपमधील थेट क्लोज्ड आउट केले जातात.
  • सेटलमेंटः ज्या बीएसई एसएमई स्कि"प्स "एम' ग्रुप मध्ये लिस्टेड आहेत (ट्रेडिंग आणि क्लिअरिंग सेटलमेंट हे नेट बेसिसवर होते) आणि ज्या "एमटी'ग्रुप मध्ये लिस्टेड आहेत (ट्रेडिंग आणि क्लिअरिंग सेटलमेंट हे ग्रोस बेसिसवर होते.)